मुंबई | “आज, उद्या वाट बघू नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू,” असा इशारा भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. महाराष्ट्रातील सगळे एसटी कर्मचारी मंत्रालयला घेराव घालायला तयार आहेत. मंत्र्यांना मंत्रालयातून बाहेर पडू देणार नाही, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला. पडळकरांनी आज (२३ नोव्हेंबर) आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले.
“मंत्र्यांना असे वाटत की, एसटी कर्मचारी हे आझाद मैदाना कोनवाड्यात ठेवल्या सारखे आहे. हे कुठे जातात. पण सरकारने असे काय समजायचं कारण नाही. आज, उद्याची आम्ही वाट बघू, नाहीत आम्ही मंत्रालयाला घाराणे घालायला (घेराव घालू) महाराष्ट्रातील सगळे कर्मचारी तयार आहेत. आतले मंत्री आत राहतील आणि बाहेरचे बाहेर राहतील. बाहेरचांना आत जाता येत नाही, आणि आतल्यांना बाहेर येता येणार नाही,” असे पडळकर बोलत होते.
आमचा अंत बघू नका
यावेळी बोलताना पडळकरांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनाचा एक संदर्भ त्यांनी दिला. पडळकर म्हटलं, “एकदा सदाभाऊने नाशिकमध्ये आंदोलन केले होते. सात दिवस कलेक्टर ऑफिसला वेडा टाकला होता. कलेक्टर आत बाहेरचे बाहेर तशी करयाची वेळ येथे येवू नये, असेही पडळकर म्हणाले. कारण तुम्ही आमचा अंत बघू नका, असा धमकी वजा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.