HW News Marathi
Covid-19

खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण!

सातारा। भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातल्या रॅग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याछु माहिती मिळत आहे. दिल्लीवरुन आल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. खासदार उदयनराजे यांच्या आईंना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय.

भीक मांगो आंदोलन

राज्यात निर्बंध शिथिल करून लोकडाऊन उठवण्यासाठी उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलन केलं होतं. हाती कटोरा घेत त्यांनी सातारच्या रस्त्यावर भिक मागितली होती. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले होते.

शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे म्हणाले होते.

काय होतं आंदोलन?

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथ भिक मागत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितलं.

सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे?

सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का?, सामनातून भाजपला सवाल

News Desk

गेल्या २४ तासांत ५ हजार ६११ आजवरची सर्वांत मोठी वाढ, कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर

News Desk

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरे म्हणतात…

News Desk