HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई | दिवंगत काँग्रेस नेते राजीव सावत यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आला आहे. काँग्रेसकडून पत्र काढून ही माहिती दिली आहे. या रिक्त जागेसाठी पक्षातील चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आणि जितेंद्र देहाडे यांच्या नावाची चर्चा होती.

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉ. प्रज्ञा सातव यांची निवड करण्यात आली. विधान परिषदेसाठी १६ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. राजीव सावत यांच्या निधनानंतर अनुसूचित जातींचा एकही आमदार नसल्यामुळे त्या जागी एससी समाजालाच प्राधान्य मिळावे, असा आग्रह दिल्लीमधील पक्षश्रेष्ठींनी केला होता. या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जातो. उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे 27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Aprna

आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ

swarit

पालघर, ठाण्यासह मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर

News Desk