HW News Marathi
महाराष्ट्र

नवीन सरकारमध्ये महिलांना स्थान मिळणार का? तालिबानचा मोठा निर्णय!

काबूल। अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं तेथे आपलं सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक माफी देऊन त्यांना मंगळवारी कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता तालिबाननं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये तालिबाननं म्हटलं आहे की, त्यांचं सरकार पूर्णपणे इस्लामिक असेल. पण त्यामध्ये महिलांचाही समावेश असेल. तालिबाननं म्हटलं की, ‘महिलांवर होणार अन्याय थांबवण्याचाही आमचा हेतू आहे.’

महिलांना त्रास व्हावा असं इस्लामी अमिरातीला वाटत नाही

याबाबतची माहिती इस्लामी अमिरात संस्कृती विभागाचे सदस्य ईनामुल्लाह समनगनी यांनी मंगळवारी अफगाणिस्तानतील सरकारी टीव्हीवर दिली आहे. ते म्हणाले की, ‘महिलांना त्रास व्हावा असं इस्लामी अमिरातीला बिलकुल वाटत नाही.’ तालिबान संघटना अफगाणिस्तानसाठी इस्लामिक अमिरात हा शब्द वापरत आहे.

सर्वसामान्य जनता देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात

अफगाणिस्तान तालिबानच्या कब्जात आलं आहे. देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अधिकतर राजकीय नेते देश सोडून पळून जात आहेत. सर्वत्र गोंधळाचं, भीतीचं वातावरण आहे. सर्वसामान्य जनता देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. विमानं रद्द करण्यात आल्यानंतर लोक रनवेवर जमले आहेत. एखादं विमान येईल आणि बाहेर पडता येईल या आशेवर ते आहेत. अफगाणिस्तानातील अतिशय विदारक परिस्थिचे फोटो समोर आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 10 कामगारांना NDRF च्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले

Aprna

‘शरद पवारांचं ना. धो. महानोरांना पत्र’

News Desk

सावधान! सरकार तुमचे व्हॉटसअप चॅट, एसएमएस वाचतंय, जितेंद्र आव्हाडांचा केंद्राला निशाणा

News Desk