गुजरात | तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर तिथली परिस्थिती चिंताजनक आहे. आज(१७ ऑगस्ट) सकाळी भारतीय हवाई दलाचं विमान जवळपास १२० भारतीयांना काबुलवरून जामनगर येथे घेऊन आलं. महत्त्वाची बाब ही की अफगाणिस्तानमधील भारताचे राजदुत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. हवाई दलाचं C-17 हे विमान जामनगर येथे उतरवण्यात आलं आहे.
नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं
भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज(१७ ऑगस्ट) सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
#WATCH | Evacuated Indians from Kabul, Afghanistan chant 'Bharat Mata Ki Jai' after landing in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/IqvESz79IO
— ANI (@ANI) August 17, 2021
विमानांचं उड्डाण बंद करण्यात आलं होतं
बिघडलेली परिस्थिती पाहता काबुल विमानतळावर विमानांचं उड्डाण बंद करण्यात आलं होतं. परंतु अमेरिकन लष्कराद्वारे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा विमानांची ये-जा सुरू करण्यात आली. यानंतरच भारतीय विमान या ठिकाणाहून उड्डाण घेऊ शकलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांना परत आणलं जात असल्याचं दिसत आहे. भारत सरकारद्वारे अफगाणिस्तानसाठी निराळ्या मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
#WATCH | Indian Air Force C-17 aircraft that took off from Kabul, Afghanistan with Indian officials, lands in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/1w3HFYef6b
— ANI (@ANI) August 17, 2021
भारत माता की जय अशा घोषणा
अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं आहे.
भारत सरकारने अफगाणिस्तानसाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष देखील उभारला आहे. याशिवाय भारत अफगाणिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. काबूलच्या एका कारखान्यांमध्ये उत्तर प्रदेशातील किमान 18 कर्मचारी अडकले आहेत. भारत सरकारनं त्यांना तिथून बाहेर पडण्याचं आवाहन केलंय. कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या मालकाने त्यांचे पासपोर्ट काढून घेतले आहेत. भारत सरकारनं व्हिसा नियमांमध्ये देखील बदल केले असून अफगाणिस्तानमधून येणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी कॅटेगरी बनवण्यात आली आहे. कारण, त्यांना विसा मिळण्यामध्ये अडचणी येऊ नयेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.