HW News Marathi
महाराष्ट्र

“लस द्याव्या असा आमचा विचार होता. मात्र, मोदी सरकारने….”, सायरस पुनावाला यांचा मोदींवर निशाणा

पुणे | कोरोनाचा फटका मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट नाही. भारत सरकार वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे. अशी जोरदार टीका सायरस पुनावाला यांनी सरकावर केली आहे.

पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको

पुण्यात निर्बंध शिथिलते वरून बरंच मोठा राजकारण झालं. गेल्या आठवड्यात पुण्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने करोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असं मत व्यक्त केलं आहे. आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने उत्तर दिले नाही

कॉकटेल लसींच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, मी कॉकटेल लसीच्या विरोधात आहे. पण आताच्या लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते. बुस्टर डोसची गरज पडेल. त्यासाठी मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे. कोव्हीशिल्डच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे अंतर हवे. कोरोना झालेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी. असेही त्यांनी सांगितले. पुण्याबाबत मोदी सरकारचे उत्तर आले नाही, मी सरकारला सांगितले की पुण्याला जास्त लस द्या कारण पुण्यात जास्त कोरोना आहे..पण ते माझे एकत नाहीत.पुण्यात जास्त कोरोना, इथे लस द्याव्या असा आमचा विचार होता. मात्र, मोदी सरकारने उत्तर दिले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीक विम्याची रक्कम थकीत कर्ज म्हणून वसूल करण्याचे आदेश

News Desk

लसीकरणाची किंमत समान हवी, मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

News Desk