HW News Marathi
महाराष्ट्र

‘नवाब मलिकांची ट्विटरच्या भूमिकेवर शंका’, राष्ट्रवादी राहुल गांधींसाठी आक्रमक!

मुंबई। काँग्रेस नेते राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने थेट ट्विटर इंडियालाच घेरलं आहे. तुमची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे? ते एकदा जाहीरच करा, असा कळीचा प्रश्नच राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे.

ट्विटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ट्विटरने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी ट्विटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली आहे. ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

याबाबतची पॉलिसी ट्विटर इंडियाने स्पष्ट करावी

मागील काही दिवसांपूर्वी ट्विटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोणत्या गोष्टींसाठी आणि कोणत्या कारणांसाठी हँडल आणि पोस्ट ब्लॉक करणार आहे. किती दिवसांसाठी व त्यांच्या कक्षेत जी – जी ट्विटर हँडल येतील त्या सर्वांवर कारवाई करणार का? याबाबतची पॉलिसी ट्विटर इंडियाने स्पष्ट करावी अन्यथा केंद्रसरकारच्या दबावाखाली ट्विटर काम करतंय ही जनतेची शंका अजून वाढेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला

दरम्यान, मलिक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांचा पलटवार

या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे, अशी टीका मलिक यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्यासाठी “एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी” ची आगामी तीन वर्षासाठी निवड!

News Desk

आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री !

News Desk

“आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे” – राज ठाकरे 

News Desk