HW News Marathi
महाराष्ट्र

‘भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही!’ सदा सरवणकरांचं मोठं विधान

मुंबई | शिवसेनेचे खासदार सदा सरवणकर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे. दादर, माहीम परिसरात कार्यालय उघडणाऱ्या भाजप आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर कडाडले आहेत. त्यांना कितीही दुकाने उघडू द्या. त्यांना दादर, माहीमच काय कोकणातही जिंकू देणार नाही, असा दावाच सदा सरवणकर यांनी केला आहे.

भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही

सदा सरवणकर यांनी नितेश राणेंवर थेट निशाणा साधला आहे. भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही. भाजप आणि नितेश राणे यांनी अशी अनेक दुकाने उघडली आहे. त्यांनी कितीही दुकाने उघडू द्या. नितेश राणेंना आम्ही त्यांच्या कोकणातल्या मतदार संघात ही जिंकू देणार नाही, असा इशारा सरवणकर यांनी दिला आहे.

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही

नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या महिन्यात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते माहीममध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.

हा शिवसेनेचा बालेकिल्ला

सदा सांवरकरांनी नितेश राणेंना थेट आव्हान दिल आहे. मुंबईत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर आमचा जोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कार्यालय स्थापन केलं आहे. आता आम्ही मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाणार. महापालिका निवडणुका येईपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत आमचे काम सुरूच राहील, असं सांगतानाच हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं जातं. जिथे पाणी लोकांना मिळत नाही, तो बालेकिल्ला. जिथे कचऱ्याचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला. जिथे धुळीचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि उद्या हाच बालेकिल्ला आमचा करू, असंही ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात शिवशाही-खासगी बसमध्ये धडक, ५० जण जखमी

News Desk

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थापना का आणि कशी केली होती ?

News Desk

अजित पवारांची खेळी ! मधुकर पिचडांचे खंदे समर्थक सीताराम गायकर राष्ट्रवादीच्या गोटात सामील

News Desk