HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का! मुलगा ऋषिकेश देशमुखांना ED चं समन्स 

मुंबई । माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा काही संपता संपत नाही. एकीकडे नुकतंच ईडी चौकशीला सामोरं गेल्यानंतर अनिल देशमुखांना दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागत असताना आता दुसरीकडे मुख कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण, आता ईडीने अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुखांना देखील समन्स धाडलं आहे. त्यामुळे, ऋषिकेश देशमुखांना चौकशीसाठी आज (५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंहांनी केलेल्या १०० कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी सध्या अनिल देशमुख तुरुंगात आहेत. पण हे प्रकरण आता वेगळ्याच आश्चर्यकारक वळणावर आहे. कारण, चांदीवाल आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात परमबीरसिंहांनी एक कबुली दिली आहे. “अनिल देशमुखांविरोधात आता माझ्याकडे आणखी कोणतेही पुरावे नाहीत”, असं परमबीर सिंह यांनी आपल्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

परमबीरसिंहाच्या आरोपांमुळे अनिल देशमुख मोठ्या अडचणीत सापडले. “अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देत होते. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे”, असे गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केले होते. याच आरोपांमुळे सध्या अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मात्र, दुसरीकडे परमबीर आता आपल्याकडे याविषयी कोणतेही पुरावे नसल्याचं म्हणतात. त्यामुळे, हे प्रकरण रोज नवी वळणं घेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे”, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची माहिती

News Desk

कल्याण-डोंबिवलीत बसलेल्या धक्क्याचा ‘मनसे’ने थेट कोकणात घेतला बदला

News Desk

विधानसभा पुढच्या वर्षी घ्या, राज ठाकरेंची मागणी !

Arati More