HW News Marathi
महाराष्ट्र

समीर वानखेडेंच्या सत्कारावर आक्षेप; राज्य सरकारकडे कारवाईची मागणी

मुंबई। एनसबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा बुधवारी शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान या संघटनेने सत्कार केला. मात्र, यावर आक्षेप घेण्यात आला असून राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. आरपीआयचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी यावर आक्षेप घेत राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे प्रशासनाला आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जात, धर्म, लिंगभेद, वर्णभेद नसतो. समीर वानखेडे हे विशिष्ट धर्मीय आहेत म्हणून कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करणं चुकीचं आहे. महाराषअट्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी विनंती सचिन खरात यांनी केली.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान ही संघटना पुढे आली आहे

राज्यात खोट्या ड्रग्ज कारवायांचे आरोप झाल्याने वादात सापडलेल्या एनसबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान ही संघटना पुढे आली आहे. या संघटनेनं आज समीर वानखेडे यांचा एनसीबीच्या कार्यालयासमोर सत्कार केला. वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच, छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कारवायांवरच संशय व्यक्त केला आहे. तसंच, वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळवली, असा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी याबाबत पुरावे देखील सादर केले आहेत. तसंच, एनसीबीच्या कारवाईतील पंचांच्या गौप्यस्फोटामुळे समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत.

वानखेडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ काही हिंदुत्ववादी संघटना समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान या संघटनेनं थेट एनसीबीच्या कार्यालयासमोर समीर वानखेडे यांचा सत्कार केला. तसंच, वानखेडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तान’चे नितीन चौगुले म्हणाले. नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करत असून त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना आमचा विरोध आहे. त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत राहू, असंही चौगुले यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही !

News Desk

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, रोहित पवारांचे मुंडेंना समर्थन  

News Desk

सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय – संजय राऊत

News Desk