HW News Marathi
देश / विदेश

भाजपा नेते अश्विनी उपाध्याय दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांच्या सह ६ जणांना अटक केली आहे. देशाची राजधानी दिल्लीतील जंतर – मंतर येथे ८ ऑगस्ट रोजी निदर्शनादरम्यान केलेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा आता गंभीर बनला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलीस मंगळवारी सकाळपासून या सर्वांची चौकशी करत आहेत, तर गुन्हे शाखाही या प्रकरणात सक्रिय आहे. घोषणा देणाऱ्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीस अजूनही शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानात जाती विषयी घोषणा दिल्या बदल दिल्ली पोलिसांनी सोमवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला. भारत जोडो आंदोलनाच्या वतीने जंतर -मंतरवर निदर्शने करण्यात आली होती. भारत जोडो आंदोलनाचे मीडिया प्रभारी शिप्रा श्रीवास्तव यांनी सांगितले की, आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी केले. मात्र, त्यांनी जातीय घोषणा देणाऱ्यांशी कोणताही संबंध नाकारला आहे.

व्हिडीओ बनावट असेल तर कारवाई करावी

अश्विनी उपाध्यय यांनी या विषयी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणले, ““व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, जर ती खरी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल तर कारवाई करावी. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही भारत छोडो दिन साजरा करण्यासाठी, इंग्रजी कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो.”

अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांनी व्हिडिओ अनेकवेळा पाहिला आहे. पण त्या घोषणा देणाऱ्यांचा शोध लागला नाही. पोलिसांनी याची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अजून अटक होणार नाही, चौकशी केली तर आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. माझी प्रकृती ठीक नाही, तरी देखील पोलिसांच्या सांगण्यावरून मी पोहोचलो आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सवर्ण आरक्षण विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk

एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!

News Desk