HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 568 रुग्णांची कोरोनावर मात!

मुंबई। राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक होतांना दिसते, तर आता राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र तरी देखील अद्यापही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय, कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येतही रोज भर पडतच आहे. राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जात आहे. तर दुसरीकडे रोज कोरोनातून मोठ्यासंख्येने रूग्ण देखील बरे होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ७ हजार ५६८ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ४ हजार ५०५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ६८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५१,९५६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७६ टक्के एवढे झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सरकारमध्ये सांगून येणार नाही आता डायरेक्ट कृतीच करणार” दरेकरांचं वक्तव्य ! “मिशन कमळ” ?

News Desk

नवनीत राणांनी खासदारकींचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहावं!

News Desk

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानी EDची छापेमारी

Aprna