HW News Marathi
क्राइम

काशिफ खान म्हणाला, “मी समीर वानखेडेंना…”

मुंबई | क्रूजवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि त्यांच्या मित्रांना एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण वादग्रस्त बनले होते. या प्रकरणात मलिक यांनी एनसीबीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्टीत क्रूजवर असलेला दाढीवाला कोण असे म्हणून त्यांनी सस्पेन्स वाढविला होता. या दाढीवाल्यासोबत एक महिला नृत्य करत असून तिच्या हातात पिस्तूल असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याबाबत काशिफ खान याने खुलासा केला आहे. दाढीवाला अर्थात काशिफ खान याने प्रतिक्रिया दिली असून मी वानखेडेंना ओळखत नाही. तरीही मलिक असा का दावा करत आहेत हेच कळत नाही, असे तो म्हणाला. मलिक यांनी केलेले सर्व दावे त्याने फेटाळून लावले.

आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत. मी त्यांना ओळखत नाही, मी कधीही त्यांना भेटलेलो नाही

तो म्हणाला, ‘नवाब मलिक यांच्याकडे अपुरी आणि चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी सिगारेटही ओढत नाही. या गोष्टी मला ओळखणाऱ्या सर्व लोकांना माहीत आहेत. माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत. मी त्यांना ओळखत नाही, मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. मला या प्रकरणात का ओढत आहेत हेच मला कळत नाही. त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे.’

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रॅक्टरच्या आमिष व फसवणूकप्रकरणी चेतन भालचंद्र नांदणीकरांना अटक

News Desk

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

News Desk

“…कोठ्यावर नाचते”, संजय राऊतांची गंभीर आरोप

Aprna