HW News Marathi
Uncategorized

भाजपने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं!

मुंबई । “केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचंपाप केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे’, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

टिळक भवनात पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसचे अनेक नेते बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणलं. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचं काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणलं जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचं काम केलं जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असं आवाहनही पटोले यांनी केलं.
काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळतेच!
काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार याविषयी म्हणाले की, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळते हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिलं आहे. काँग्रेसच्या पाठीमागे दलितांचं संघटन उभं करा. काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आला पाहिजे. त्यासाठी संघटन वाढवा आणि संघटन वाढवण्यासाठी संपर्क, समर्पण, संवाद, साधना, समन्वय या पाच घटकांवर भर द्या.
बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करत रहा!
तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. संविधान व लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची भूमिका कायम घेतली आहे. म्हणूनच सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही मोठी संधी काँग्रेसमध्ये दिली जाते. कार्यकर्ता चांगलं काम करत असेल, निष्ठावान असेल तर पक्ष त्याची नक्की दखल घेतो त्याचेच उदाहरण सिद्धार्थ हत्तीअंबिरे आहे. काँग्रेसचा विचार, बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करत रहा, असं आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केलं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांद्याचे दर गडगडले

News Desk

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

News Desk

Sharad Pawar | देशात परिवर्तनासाठी अनकूल वातावरण !

News Desk