HW News Marathi
Uncategorized

किरण गोसावी पुरता अडकणार?

पुणे | पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून किरण गोसावी याचा शोध घेत होते. मात्र तो वेगवेगळी नावे धारण करत पोलिसांनी चकवा देत होता. मात्र आज अखेर त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.आर्थिक फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी आज सकाळी अटक केली. त्यानंतर गोसावी याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं

गोसावी याने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड खरेदी केले, तसंच बँक अकाऊंट ओपनिंगसाठी त्याने खोटी सही केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता भादंविक ४६५, ४६८ अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.किरण गोसावी याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ साली एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. नोकरीच्या आमिषाने त्याने एका तरुणाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. तसंच, अन्य काही तरुणांना देखील त्याने फसवले होते. त्याच्याविरोधात २०१९ रोजी त्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. मात्र, मुंबईच्या समुद्रात क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत आर्यन खानला घेऊन जाताना गोसावी सर्वप्रथम दिसून आला होता. तो या प्रकरणात नार्कोटिक्स क्राइम ब्युरोचा पंच होता.

यानंतर पुणे पोलिस गोसावीच्या शोधात होते. दरम्यान, पोलिसांनी गोसावीविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. तसंच, त्याच्या एका मॅनेजरला अटक देखील केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बंगालची वाघीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, बनर्जींचा अनुभव पवारांच्या उंचीचा!” – राऊत

News Desk

कोपर्डी खटल्याची आज सुनावणी

News Desk

Nashik Bus Accident : 11 प्रवाश्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Seema Adhe