HW News Marathi
महाराष्ट्र

‘जॉन्सन अँड जॉन्सन लशीला भारतात मान्यता’, 2 नाही तर घ्यावा लागणार कोरोना लशीचा एकच डोस!

मुंबई। अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी भारतात मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात या लशीचा वापर महत्त्वाचा ठरेल. भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवं व्हॅक्सिन आहे. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

मांडविया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘भारताच्या व्हॅक्सिन बास्केटचा विस्तार होत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. भारताकडे आता पाच EUA व्हॅक्सिन्स आहेत. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील सामुहिक लढ्याला चालना मिळेल.’

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला धक्का ,अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI चे छापे !

News Desk

घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

Manasi Devkar

पुण्याची अवस्था मुंबईसारखी होऊ नये !, महापौरांनी व्यक्त केली भीती

News Desk