नागपूर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराच्या नावातून राजीव गांधी यांचं नाव हटवण्याच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव हटवून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान असल्याचं म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. तसेच भाजप गांधी परिवाराला घाबरत असल्याचंही ते म्हणाले.
भाजप गांधी परिवाराला घाबरते
नाना पटोले म्हणाले, “भाजपला गांधी परिवाराची भीती वाटतेय. त्यामुळेच भाजपने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललंय. भाजपची ही मनोवृग्न वृत्ती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान आहेत.”
राज्यपालांनी संविधानाप्रमाणेच वागावं
एक दिवस सासूचा एक दिवस सुनेचा असतो असा आमचा देवेंद्र फडणवीस यांना संदेश द्या. राजभवनामध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था सुरु झाली आहे. ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यपालांना काही संवैधानिक मर्यादा आहेत. त्यांनी त्या प्रमाणेच वागलं पाहिजे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे संविधानाला मानणार राज्य आहे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री. एच के पाटील यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत साहित्याने भरलेल्या ट्रकला झेंडा दाखवला.
मंत्रीमंडळातील तसेच मुंबई कॉंग्रेस व प्रदेश काँग्रेसचे सहकारी यांच्यासह बैठक व पत्रकार परिषद घेण्यात आली. pic.twitter.com/rrsp0huE8b— Nana Patole (@NANA_PATOLE) August 7, 2021
दीड लाखात घर बांधून होत नाही
यावेळी त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या पूरग्रस्तांच्या पॅकेजवरही भाष्य केलं. सरकारकडून मिळालेली मदत अपुरी आहे. घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये देण्यात आले आहेत. पण दीड लाखात घर बांधून होत नाही. त्यामुळे घर बांधणीसाठीच्या रकमेत वाढ करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे, असं ते म्हणाले. शेती, घर, व्यापारी, जनावरे, रस्त्यांचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता ही नैसर्गिक आपत्ती होती. यामध्ये जे परिवार उद्ध्वस्त झालेत. त्यांना उभं करण्याच धोरण तपासण्याच काम आम्ही केलेले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.