HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात, ८ जण गंभीर जखमी!

मुंबई। मुंबईत आज दादर टीटी उड्डाणपूलाजवळ तेजस्विनी बसचा भीषण अपघात झाला. तेजस्विनी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सिग्नलवर उभ्या असलेल्या एका डंपरवर धडकली. या भीषण अपघातात ८ जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर सह ३ जण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तेजस्विनी बस ही मरोळ आगाराच्या क्रमांक २२ नंबरची बस असून मरोळ ते पायधूनी असा प्रवास करत होती. याच दरम्यान दादर टीटीच्या दिशेने जाताना हा भीषण अपघात झाला. हा भीषण अपघात दादर उड्डाणपूलाजवळ असलेल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुदैवाने या भीषण उपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

कंडक्टर काशिराम धुरी (५७), ड्रायव्हर राजेंद्र (५३) यांच्यासह तिहार हुसैन ( ३६), सुलतान (५०),मनसुर अली (५२), श्रावणी म्हक्से (१६), वैदेही बामने (१७) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. आठ जखमी व्यक्तीपैकी ३ जण सुखरुप असून ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून बस डंपरला धडकताच मोठा आवाज झाला आणि प्रवाशी तात्काळ आपला जीव वाचवण्यासाठी बसमधून खाली उतरले. अपघात इतका गंभीर होता की यात तेजस्विनी बसचा चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत त्याचप्रमाणे नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ त्याचप्रमाणे रामदास कांबळे हे संध्याकाळी ४ वाजता जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे काही रामराज्य आहे का?,” संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk

‘मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं’, अजित पवार चुकून चुकले!

News Desk

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna