HW News Marathi
महाराष्ट्र

समीर वानखेडेंचा नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी दिला सूचक इशारा


मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची मालिका सुरुच आहे. नवाब मलिक यांनी सकाळीच ट्विट्स करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या लग्नाचा फोटो ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. हा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी म्हटलं, “स्वीट कपलचा फोटो – समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.”

तर दुसऱ्या ट्विटमध्ये नावब मलिकांनी म्हटलं, समीर दाऊद वानखेडेच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा लवकरच सादर करत आहे.

वानखेडे यांनी मंत्र्यांच्या या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी मुंबईत येणार असल्याचे सांगितले

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी त्यांचे वडील आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जारी केले आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये समीरचे वडील मेहर जातीतील आहेत. जे SC मध्ये येते. समीर वानखेडे यांनी कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर प्रत, कौटुंबिक फोटो शेअर केले असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रात छेडछाड केली नसल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांनी मंत्र्यांच्या या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच ठरला ‘मोठा भाऊ’ शिवसेनेनेही केले मान्य

News Desk

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे! – दादाजी भुसे

Aprna

पुण्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरेंची घेतली भेट!

News Desk