HW News Marathi
महाराष्ट्र

“त्यांना आत्मसमर्पण करु द्या..” – प्रभाकर साईल

मुंबई। क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे तुरुंगात असलेला बॉलीवूड किंग शाहरुखचा खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन केव्हा मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. तर दुसरीकडे याप्रकरणात राजकारण्यांकडून रोज नवीन खुलासे होत असल्याने लोकांमध्ये एनसीबीच्या कार्यपद्धतीवर संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणातील फरार साक्षीदार किरण गोसावी याने आता पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली आहे. सोमवारी किरण गोसावी यांचे मोठे वक्तव्य समोर आले असून, ३० मिनिटांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचा दावा किरणने केला होता. किरण गोसावी यांच्यावर बॉडीगार्ड प्रभाकर साईलाचा आरोप आहे की गोसावी आणि सॅम यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना २५ कोटी रुपये देण्याचे सांगितले होते. त्यावरही गोसावी यांनी प्रत्युत्तर दिले होते.

पोलीस आणि एनसीबीने याची चौकशी करावी

गोसावीने मी अर्ध्या तासात महाराष्ट्राबाहेर आत्मसमर्पण करत आहे. सर्व काही स्पष्ट होईल असे म्हटले होते. त्याचवेळी प्रभाकर साईलने केलेल्या आरोपावर गोसावीने, सर्व आरोप खोटे असून पोलीस आणि एनसीबीने याची चौकशी करावी आणि सत्य बाहेर यावे, अशी माझी इच्छा आहे. प्रभाकरचे नेत्यासोबत संबंध असल्याने तो असे आरोप करत आहे, असे म्हटले होते. त्यावर आता पंच प्रभाकर साईलने पत्रकार परिषद घेत किरण गोसावीने केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.“नेत्यांसोबत माझे संबंध कसे असू शकतात? मी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. माझे नेत्यांसोबत असण्याचा प्रश्न कुठून आला. मी जे काही उघडकीस आणतो आहे त्यामुळे मला बदनाम करण्याचा डाव सुरु आहे. त्यांना आत्मसमर्पण करु द्या मग मी माझ्याकडे आणखी काहीतरी आहे ते तुम्हाला सांगेन,” असे प्रभाकर यांनी म्हटले आहे.

तर मी कोणासाठी जगायचे

प्रभाकर साईल म्हणाला की, ‘माझ्या घरी सतत पोलीस जातायत. आमची चौकशी केली जातेय. बायकोला बोललो तू काही करू नकोस, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नकोस. थोडे दिवस थांब दोन दिवसांचा कालावधी दे. तर मी माझ्या मित्राला काही होईल का? अशी विनंती केली. त्याने मला स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे सोलापूरचे अध्यक्ष काळे यांच्याकडे तो घेऊन गेला. मी त्यांना सर्व मोबाईलमध्ये असलेली स्टोरी सांगितली. आता मी याप्रकरणात पंच आहे, तर माझ्यावर काहीही होऊ शकत. मी आतून खूप घाबरलो होतो. मी सोलापूर गेलो. माझ्या कौटुंबिक प्रोब्लेम सगळ्यांना सांगितला आहे. जर आता माझ्या कुटुंबाला प्रोब्लेम होत असेल तर मी कोणासाठी जगायचे.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या चार जागांचा आज निकाल

News Desk

गॅसप्रमाणे रेल्वेशुल्कातले अनुदानही परत करण्याची मागणी

News Desk

युवा चाईल्ड लाईन या संस्थेमार्फत जनजागृती मोहीम

News Desk