HW News Marathi
महाराष्ट्र

“सोमय्याजी, मी आधीच पोहोचलोय…तुमचंही स्वागत”; नांदेडमध्ये काँग्रेसकडून भाजपला थेट आव्हान?

मुंबई | महाविकासआघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असं की चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्य आणि केंद्र सरकारमधील वादाचा हा एक मुख्य मुद्दा बनला आहे. याविषयीचे आरोप-प्रत्यारोप, दावे-खुलासे, टीका-टिपण्ण्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशातच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना खुलं आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या हे येत्या २६ आणि २७ ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर असणार आहेत. सोमय्यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यावर आता सचिन सावंतांनी “तुमचं स्वागत आहे”, असं म्हणत किरीट सोमय्यांना डिवचलं आहे. एक प्रकारचं आव्हानच असल्याचं म्हटलं जातं आहे.

काहीच दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक इशारा दिला होता. “ईडीची पुढील कारवाई अशोक चव्हाण यांच्यावर होणार का?” या पत्रकाराच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “माझ्या हसण्यावरुन समजून जा.” तर, अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहाराच्या खुलाशांच्या सपाटा लावलेले सोमय्या आता नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. अधिकृतपणे हे जाहीर झाल्यावर सचिन सावंतांनी ट्विट करत सोमय्यांनाच आव्हान दिलं आहे, “सोमय्याजी तुम्ही 26 ला नांदेडला येणार. मी आधीच आलोय. नांदेडमध्ये तुमचं स्वागत आहे”, असं ट्विट सचिन सावंतांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता नांदेडमध्ये असताना चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, “आता नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार का?” असा सवाल एका पत्रकाराने केला. हा प्रश्न ऐकून चंद्रकांत पाटील हसले आणि म्हणाले, “मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही.” स्पष्टपणे हा रोख अशोक चव्हाणांकडे आहे.

“चंद्रकांत पाटलांना इतकी माहिती मिळते कुठून?”

चंद्रकांत पाटलांच्या या सूचक विधानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रत्युत्तर दिलं. “चंद्रकांत पाटलांना इतकी माहिती मिळते कुठून? लोकशाहीत हे अपेक्षित नाही. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा हा प्रयत्न आहे. मी यावर काही बोलणार नाही हे फक्त राजकीय हेतूने सुरु आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोदापात्रातील नियमबाह्य वाळू उपशाविरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आमदाराचा एल्गार

News Desk

राज्यात बैठका सुरुच, महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक होणार!

News Desk

जळगावात पोस्टरचा धुमाकूळ, भाजप नेत्याच्या पोस्टरवर खडसेंचा फोटो

News Desk