HW News Marathi
महाराष्ट्र

शेगाव संस्थानचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन!

शेगाव। श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि नितीन गडकरी यांनी शिवशंकर पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं

शेगावश्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे प्रमुख शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि नितीन गडकरी यांनी शिवशंकर पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं होतं. त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.

घराजवळ असलेल्या शेतात होणार अंत्यसंस्कार

शिवशंकर पाटील मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्याकडून संत गजानन महाराज यांची सेवा झालेली आहे.

गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. श्री संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला, असं नितीन गडकरी म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ पालघर पोटनिवडणुकीत आमने-सामने

News Desk

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज नागपूर बंद !

News Desk

आरपीआयला महाराष्ट्रात उमेदवार उभे करता येत नाही .. विलास गरुड 

News Desk