नांदेड। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या विरोधात तसेच नेत्यांच्या निकटवर्तीच्यां विरोधात ईडीकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईवरुन राजकीय वातावरण तापलेले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. आज आमची तर उद्या तुमची वेळ असं म्हणत चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं आहे.
वडेट्टीवार यांनी पाटील यांना आव्हान दिले
ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यावरून कॉंग्रेसचे मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटील यांना आव्हान दिले. विजय वडेट्टीवार म्हणाले, नांदेड की बारी…. काही हरकत नाही, उद्या तुमची बारी असेल. सत्ता कोणाच्या बापाची नेहमीसाठी नसते लक्षात ठेवा. सत्ता बदलत असते आणि सगळ्यांची घर काचेची आहेत. किमान खिडकी तरी काचेची असते. दगड तर पडणार…
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक सुरू आहे. देगलूरमध्ये आयोजित प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटलं, केंद्रात आमची सत्ता आल्यास आम्ही देखील अशीच कारवाई करू.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.