HW News Marathi
महाराष्ट्र

नरेंद्र पाटलांनी काढला देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू !

मुंबई | माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरचं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलंय. नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या हातावर देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं पर्मनंट टॅटू बनवला आहे. सोशल मीडियावर सध्या हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

आधी शिवसैनिक मग भाजपात प्रवेश

देवेंद्र फडणवीसांचे फॅन नरेंद्र पाटील हे आधी शिवसेनेत होते पण मग त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं होतं.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरुन संजय निरुपम यांची हकालपट्टी ?

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…

News Desk

सुशांतच्या भावाची संजय राऊतांना नोटीस, सुशांतच्या वडलांबद्दल केलेल्या वक्तव्याची ४८ तासांत माफी मागा अन्यथा…

News Desk