HW News Marathi
महाराष्ट्र

माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

मुंबई | शिवसेनेतून बाहेर पडलेले अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत अशोक शिंदेंनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती धरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

माजी खासदारासोबत तीव्र मतभेद

अनिल शिंदेंनी त्यांचं शिवसेना सोडण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत अशोक शिंदे?

अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार

१९९५, १९९९ आणि २००९ असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव

मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद

अशोक शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते, जुलैमध्ये पक्षाला रामराम

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई भाजपच्या अध्यक्ष पदी मंगलप्रभात लोढा यांची निवड

News Desk

‘जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले असा प्रकार केंद्राने करून ओबीसींची शुद्ध फसवणूक केली’ -शरद पवार

News Desk

शरद पवार होणं कुणाचंही काम नाही!

News Desk