HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजित पवारांनी पुण्याची वाट लावलीय’, निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्ला

मुंबई | मुंबईत काही प्रमाणात निर्बंध शिथिल झालेले आहेत. पुण्यात मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत. पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारकाईनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळं ते विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली

महाविकासआघाडीचे पक्ष आणि भाजप यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. रोज आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी पुण्याची वाट लावल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. ‘ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, ते बघता पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही,’ अशी टीका नीलेश राणेंनी केली आहे.

नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.

तिसरी लाट मोठी असेल असं भाकीत आहे. तसेच आताची स्थितीही सर्वकाही सुरू करावं अशी नाही. त्यामुळे मोठ्या शहरात शिथिलता देताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी मुंबई लोकलबाबत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम

पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवल्याने नाराजी व्यक्त केली जात असून आता या मुद्द्यावरुन राजकीय वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत. विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असल्याने या निर्णयामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार हे स्पष्ट दिसत आहे. याचसंदर्भातील पहिली ठिणगी ही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या ट्विटमुळे पडली आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का?, असा प्रश्न मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन विचारलाय. मोहोळ यांनी या नव्या आदेशांमध्ये पुण्यातील निर्बंध कायम ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. “पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे,” असं मोहोळ यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध ‘त्या’ प्रकरणी वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

News Desk

क्रिकेट सोबतच सर्व खेळामध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या – रामदास आठवले यांची मागणी

News Desk

मालेगावात कोरोनाचा दुसरा बळी, आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत आणखी भर

News Desk