HW News Marathi
महाराष्ट्र

दरवाढीचा सपाटा कायम; 35 पैशांनी महागलं पेट्रोल-डिझेल

नवी दिल्ली। तेलाच्या किमती आता पुन्हा वाढल्यात. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किमतीत 35-35 पैसे प्रतिलिटरने वाढ करण्यात आलीय. यासह कार-बाईक तेलाची किंमत आता विमान तेलाच्या (ATF) पेक्षा एक तृतीयांश जास्त झालीय. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता देशभरात नव्या उच्चांकावर पोहोचल्यात. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ झाली.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमतीत प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोल आता 105.84 रुपये प्रति लिटरच्या आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. मुंबईत ते आता 111.77 रुपये प्रति लीटर झाले.सलग महाग होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

डिझेलच्या किमतीत 19 वेळा वाढ

एटीएफकडून पेट्रोलच्या किमतीत आता 33 टक्क्यांची वाढ झाली. दिल्लीत ATF 79,020.16 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 79 रुपये प्रति लीटर आहे. राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोल 117.86 रुपयांवर पोहोचले. तेथे डिझेल 105.95 रुपये प्रति लीटर झाले. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेलाच्या किमतींमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया तीन आठवड्यांनंतर पुन्हा सुरू झाली. त्यानंतर पेट्रोलमध्ये झालेली ही 16 वी वाढ आहे. त्याचबरोबर या काळात डिझेलच्या किमतीत 19 वेळा वाढ करण्यात आली आहे.

100 रुपये प्रति लिटरच्या पार

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बँकेच्या ठेवीदारांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्राचं पाऊल…’, केंद्रीय अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवा कृषी कायदा करावा – अशोक चव्हाण

News Desk

अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत अडचण कसली, ठाकऱ्यांचा भाजपला सवाल

News Desk