HW News Marathi
देश / विदेश

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या सरसंघचालकाकडून केंद्राला सूचना

नागपूर | संघाच्या नागपूर महानगरचा विजयादशमी उत्सव रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात दोनशे स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी बोलताना सरसंघचालक म्हणाले,’लोकसंख्येचे असंतुलन समस्या ठरत आहे. पूर्वोत्तर राज्यामध्ये धार्मिक आधारावरील असंतुलित लोकसंख्येमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार या सीमावर्ती राज्यांतील मुस्लिम लोकसंख्येची वृद्धी सरासरीपेक्षा अधिक आहे.

लोकसंख्या असंतुलन पाहता सर्वांसाठी लोकसंख्या कायदा लागू करावा

‘केंद्र सरकारने लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा. धार्मिक आधारावर सुरू असलेल्या असमान प्रजनन दराचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाची संसाधन क्षमता, भविष्यातील आवश्यकता आणि लोकसंख्या असंतुलन पाहता सर्वांसाठी लोकसंख्या कायदा लागू करावा,’ अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) आवश्यकता आहे. संघाने याबाबत रांची येथे २०१५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पारित केला आहे. काही विद्वानांनीदेखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे समर्थन केले आहे. केंद्राने एनआरसी अंतर्गत घुसखोरांना नागरिकता आणि जमीन खरेदीच्या अधिकारापासून वंचित करायला हवे.’ देशांतर्गत सुरक्षेबाबत बोलताना भागवत म्हणाले,’सागरी टापूंसह सर्व सीमा अधिक मजबूत करायला हव्यात. कलम ३७० रद्द केल्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मात्र, तेथील नागरिकांमध्ये ते भारताचे अंग आहेत ही भावना निर्माण करण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना फोनकरून राज्याच्या परिस्थितीवर चर्चा

swarit

सौदीत दहा भारतीयांचा मृत्यू

News Desk

5 बँकांचे 500 कोटी बुडवून आणखी एक बिझनेसमॅन पसार

News Desk