HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यासाठी रवाना!

मुंबई | राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीने नागरिकांचं नुकसान केलं आहे. केवळ कोकणातच नाहीतर तर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौरा करणार आहेत. सांगलीकरांना झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी कोकण आणि कोल्हापूरचा दौरा केला होता.

अजूनही सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका

पुराचं पाणी जरी कमी झालं असलं तरीदेखील पुराचा धोका कायम आहे. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळं अनेक गावं पाण्याखाली गेली होती. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळं अजूनही सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज ते सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. तिथल्या पूरपरिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता पलूस येथे कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. सांगलीच्या पलुस तालुक्यातील भिलवडी भागातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. पुरामुळे बाधित भागाची पाहणी करुन मुख्यमंत्री पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पलुस तालुक्यातील अंकलखोप येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची ते पाहणी करतील. त्यानंतर मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या भागात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री करतील.

ग्रामीण भागातील पाहणीनंतर सांगलीच्या आयर्विन पुलाची पाहणी, तसेच हरभट रोड येथे पुरामुळे बाधित भागाची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आणि पत्रकार परिषद असा आज सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण दौरा आहे. दोन वाजता कवलापूर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका नाही तर…!, अजित पवारांची माहिती

Aprna

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

News Desk

शिवसेनेच्या आमदारांशी बातचीत केल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदारांना भेटणार!

News Desk