HW News Marathi
महाराष्ट्र

सिंधूने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये टोकियोत केली कांस्यपदकाची विक्रमी कामगिरी!

टोकियो। भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. सिंधूला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्य फेरीत झू यिंगविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने तिचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु, कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सिंधूने उत्कृष्ट खेळ केला. तिने या सामन्यात चीनच्या हि बिंगजिओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. या विजयासह तिने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. सिंधूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती भारताची पहिलीवहिली महिला खेळाडू ठरली.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची विक्रमी कामगिरी

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. सिंधूला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्य फेरीत ताई झू यिंगविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने तिचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु, कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सिंधूने उत्कृष्ट खेळ केला. तिने या सामन्यात चीनच्या हि बिंगजिओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. या विजयासह तिने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. सिंधूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती भारताची पहिलीवहिली महिला खेळाडू ठरली.

सिंधूने खेळ उंचावला

दुसऱ्या गेममध्येही सुरुवातीला बिंगजिओने सिंधूला झुंज दिली. तिने सिंधूला सहज गुण जिंकू दिले नाहीत. परंतु, सिंधूने खेळ उंचावला आणि या गेमच्या मध्यंतराला ११-८ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर बिंगजिओने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत ११-११ अशी बरोबरी केली. पुढे मात्र सिंधूने पुन्हा आक्रमक खेळ करत १८-१४ अशी आघाडी मिळवली. तसेच यानंतरचे चार पैकी तीन गुण मिळवत सिंधूने दुसरा गेम २१-१५ अशा फरकाने जिंकला आणि कांस्यपदक पटकावले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर 

News Desk

‘छगन भुजबळांनी इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार घ्यावा,’ आम्ही पाठिंबा देऊ भाजपा!

News Desk

लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांनी पुन्हा धरली घरची वाट!

News Desk