HW News Marathi
महाराष्ट्र

शिवलीला पाटलांच्या किर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; तिन्ही आयोजकांवर गुन्हा दाखल

कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळानं देऊळगाव मही येथे नवरात्रीच्या निमित्ताने शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, यावेळी मोठी गर्दी झाल्याने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बुलडाणा पोलिसांकडून तिन्ही आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवलीला पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याच्या कारणास्तव आयोजक संदीप राऊत, गणेश साहेबराव गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘बिग बॉस’मराठीच्या तिसऱ्या पर्वात शिवलीला पाटील सहभागी झाल्या. मात्र, त्यानंतर त्यांना वारकरी संप्रदाय आणि वारकरी संघटनांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा विरोध

पुढे प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील या ‘बिग बॉस’मधून बाहेर देखील पडल्या. त्याचसोबत, याप्रकरणी नुकताच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात शिवलीला यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याबद्दल माफी देखील मागितली. माहितीनुसार, शिवलीला पाटील यांच्या कीर्तनासाठी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध देखील दर्शवला होता. मात्र, त्यानंतरही आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… म्हणून पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं”, उध्दव ठाकरेंकडून राज्यपालांना प्रत्यूत्तर!

News Desk

गणेश नाईक मतदारसंघातील कामं करत नाहीत, मला सीमोल्लंघन करावंच लागेल – मंदा म्हात्रे

News Desk

नव्या गाण्यासोबत मी पुन्हा येईन – अमृता फडणवीस 

News Desk