HW News Marathi
महाराष्ट्र

‘राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत’, शंभूराज देसाईंचं मोठं विधान

मुंबई। केंद्रीयमंत्री नारायण राणे हे सतत विरोधी पक्षावर टीका करत असतात. त्यांच्या सततच्या टीकांमुळे विरोधी पक्षाचे नेते आता चांगलेच खवळलेले दिसत आहेत. २५ जून रोजी चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर झापताना सीएम बीएम गेला उडत, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे.

नारायण राणेंचं तोंड बंद शिवसैनिक करू शकतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीके वरून आता शिवसैनिक नारायण राणेंवर चांगलेच भडकले आहेत. नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी नारायण राणेंना इशाराच दिलाय.

काय म्हणाले नारायण राणे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २५ जुलैला चिपळुणमधल्या पुराचा आढावा घेतला होता. त्यावेळी, ‘सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही. मला कुणीही सीईओ वगैरे भेटलेला नाही, मी बाजारपेठेतच उभा आहे, कुठे आहेत सीईओ दाखवा’ असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं आहे.

मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचा

नारायण राणे हे चिपळूण दौऱ्यावर आहेत . तिथली पाहणी करून झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना ‘मंत्री करतो’ असा शब्द दिला नाही !

News Desk

“कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले!

News Desk

परळी मतदार संघातील रस्त्यांच्या विकास कामांवरून मुंडे बहीण-भावातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Aprna