HW News Marathi
महाराष्ट्र

आता टाटांनंतर झुनझुनवाला यांच्या ‘Akasa Air’ या विमान कंपनीला मंजुरी!

नवी दिल्ली। कोरोना च्या संकटात अनेकांना वेगवेळ्या संकटांचा सामना करावा लागला आणि याचाच फटका मोठ्या कंपन्यांना झाला आहे. मोठे नुकसान सहन करावे लागतेय, परंतु अनुभवी उद्योगपतींना वाटते की, येत्या काळात हा एक फायदेशीर करार ठरेल. देशातील वॉरेन बफे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअरलाईन्सला सरकारकडून एनओसी प्रमाणपत्र मिळालेय. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत माहिती शेअर केलीय. ते म्हणाले की, कंपनी लवकरच ‘Akasa Air’ या नावाने विमान सेवा सुरू करेल. असे मानले जाते की, पुढील वर्षी उन्हाळी हंगामात त्यांचे ऑपरेशन सुरू केले जाईल.

खरेदीसाठी आकाश एअरशी चर्चा करीत आहे

एअरबस चीफ कमर्शियल ऑफिसर क्रिस्टीन शेररने अलीकडेच वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिची कंपनी विमान खरेदीसाठी आकाश एअरशी चर्चा करीत आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, आकाश एअरने अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगशीही संपर्क साधला. त्याला बोईंगकडून B737 मॅक्स विमान खरेदी करण्यात रस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोईंग B737 मॅक्स विमानांच्या मदतीने आणि एअरबस A320 विमानांच्या मदतीने विमान उद्योगात स्पर्धा करत आहे.

पीएम मोदींनी ट्विट केले होते

आकाश एअरला जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांनी पाठिंबा दिलाय. विमान कंपनी आता डीजीसीएकडून परवाना मिळण्याची वाट पाहत आहे. जर परवाना वेळेवर मिळाला, तर 2022 च्या उन्हाळ्यात तुम्ही आकाश एअरने हवाई प्रवास करू शकाल. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष हेही आकाश एअरच्या बोर्डात आहेत. त्यांनी विनय दुबे यांच्या टीमला एनओसी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. अलीकडेच राकेश झुनझुनवाला आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात पीएम मोदींनी ट्विट केले होते की, मला त्यांना भेटून आनंद झाला आणि ते भारतीय बाजाराबद्दल खूप उत्साही आहेत.

राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणतात

अलीकडेच टाटा समूहाने एअर इंडियाला 18 हजार कोटींमध्ये खरेदी केले आहे. विस्तारा, एअर एशिया इंडिया एअरलाईनच्या मदतीने टाटा समूह विमान क्षेत्रामध्ये आधीच उपस्थित होता. 2020-21 या आर्थिक वर्षात दोन्ही विमान कंपन्यांचे एकत्रित नुकसान 3200 कोटींपेक्षा जास्त होते. आता एअर इंडिया खरेदी केल्यानंतर टाटा समूहाच्या आकाश उड्डाणाचा आकार खूप मोठा झालाय.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एअर पुढील वर्षी उन्हाळी हंगामात ऑपरेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. पुढील चार वर्षांत कंपनीने 70 विमानांचा ताफा तयार करण्याची योजना आखली आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणतात. त्याची संपत्ती $ 5.7 अब्ज (ऑक्टोबर 2021) आहे. त्यांनी एअरलाईन कंपन्यांमध्ये जवळपास 250 कोटींची गुंतवणूक केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात १० हजार पोलिसभरती करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

News Desk

महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल

News Desk

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी; भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारीला मुंबई सायबर सेलने घेतले ताब्यात

Aprna