HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआय पथक तर अडचणीत पुन्हा वाढ!


मुंबई। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या घरी सीबीआयचं पथक दाखल झालं आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसंच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.

संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली

याप्रकरणी परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही केली होती. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.काही महिन्यांपूर्वी सीबीआयने देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजरही राहिले होते.

ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीयेत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna

पॅन कार्ड,आधार कार्ड ऑनलाईन जोडा

News Desk

आधी चीन-अतिरेक्यांना उखडून फेका, मग महाविकासआघाडीकडे वळा!

swarit