HW News Marathi
महाराष्ट्र

एफ आर पी चे तीन तुकडे करणाऱ्याच्या बाजूनेच शरद पवार! राजू शेट्टींची पवारांवर घणाघाती टीका!


बीड। हे सरकार तोंडी सरकार आहे साताऱ्यात अगदी भिजत भिजत शरद पवार म्हणाले होते की मी शेतकऱ्याच्या बाजूने आहे. परंतु एफ आर पी चे तीन तुकडे करण्यात आले आणि या तीन तुकडे करणाऱ्यांच्या बाजूनेच शरद पवार आहेत, मग राहील कोण फक्त शेतकरी आणि म्हणूंनच सगळ्या देवाकडे चाललो मी , अरे देवा परमेश्वर तू तरी आमच्या बाजूने राहा .बाकी सगळे तिकडे गेले आहेत काही फरक पडत नाही पण मी तुम्हाला खात्री देतो मी एकटाच या सगळ्यांना लोळवल्याशिवाय सोडत नाही असा घणाघात राजू शेट्टी ने बीड जिल्हातील केज तालुक्यातील ,बनसारोळा येथे शेतकरी ऊस परिषद मेळाव्यास संबोधन करतांना शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

चौपट राजा अशी अवस्था झालेली आहे

पुढे बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की,सरकार शेतकऱ्यासोबत वैऱ्या सारखे वागत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये काही फारसा फरक नाही, कारण केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये महापूर झाला आणि पाहणी करायला आता पथक पाठवले. मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी तर मार्च-एप्रिलमध्ये पथक पाठवतील सद्या अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था झालेली आहे.

माजलेल्या अधिकाऱ्यांना आवरा

शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन राज्यातील शेतकऱ्यांची सर्व पिक कर्जे माफ करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना आर्थिक जबाबदारी झटकून चालणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावरती आहोत. त्यामुळं या माजलेल्या अधिकाऱ्यांना आवरा अन्यथा हा शेतकरी सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिलाय.

सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर

शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलेले नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यातच सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे. तर, दुसरीकडे या संदर्भात ऊसाची एफ आर पी तीन टप्प्यात देण्याचे धोरण कारखानदार आणि सरकार राबवत आहे. विमा कंपन्यांनी प्रचंड बदमाशी केली असून विमा कंपनी खोटे रेकॉर्ड तयार करत आहे. या संदर्भात पुरावे आमच्याकडे आहेत. क्रॉप कटिंगचा रिपोर्ट सरळ-सरळ खोटा दिलेला आहे. एफआरपी च्या धोरणासंदर्भात आमचा कायम विरोध आहे. यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि कारखानदार चुकीचं धोरण राबवत आहे. शेतकरी एकटा पडलेला आहे केंद्र आणि राज्य आणि साखर कारखानदार यांच्या विरोधात सुद्धा आम्ही ही लढाई लढून जिंकणार आहोत असेही शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांवर अन्याय झालाय हे महत्वाचे

ते पुढे बोलतांना म्हणाले की,आम्ही महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी उद्याच्या बंदला आमचा पाठिंबाच आहे. कोणी बंद पुकारला हे महत्वाचे नसून उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांवर अन्याय झालाय हे महत्वाचे आहे. अगदी जनरल डायरने सुद्धा शरमेने मान खाली घालावी या पद्धतीने गृह मंत्र्याच्या पुत्राने शेतकर्‍यांच्या अंगावरती गाडी घालून पाच शेतकऱ्यांना मारले. त्या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे असे राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्याला गृहीत धरू नका शेतकरी एक दिवस तुमच्या मानगुटीवर बसल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हयात बोकाळलेला ‘माफिया राज’ बंद करा बीड

News Desk

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे! – बच्चू कडू

Aprna

ज्येष्ठ समीक्षक मधुकर पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार

News Desk