HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा झेंडा!

पुणे। पुणेकरांना आज मेट्रो दर्शन होणार आहे . वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली. अजित पवारांनी रिमोटने मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.

ऑक्टोबरमध्ये प्रवास सुरु करण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर आज(३० जुलै) पुणेकरांना मेट्रोची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्याची महामेट्रोचा विचार आहे.

कोरोना पसाऱ्यात नको म्हणून सकाळी कार्यक्रम घेतला

अजित पवारांनी ‘कोरोना पसरू नये म्हणून सकाळी कार्यक्रम घेण्याचं’ स्पष्ट केलं आहे. “सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला? तर सकाळी सुरुवात चांगली होते. कोरोनाचं संकट आहे, आम्हीच नियम करायचे, अन् मोडायचे कसे? गर्दी नको म्हणून मी सकाळी 6 ला घ्या म्हटलं होतं, पण दीक्षित म्हणाले 7 ला घेऊ. इतर पुणेकरांना त्रास व्हायला नको, गर्दी व्हायला नको. म्हणून कार्यक्रम लवकर घेतला. आम्ही कार्यक्रम घेतो, लोक गर्दी करतात, मग आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, इथं दीक्षितांवर गुन्हा दाखल व्हायला नको हा ही विचार होता” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत भाजप सेनेच्या पाठिशी : मुख्यमंत्री

News Desk

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk

अडतीस गाव पाणी पुरवठा सौर प्रकल्पामुळे २५ लाखांहून अधिक पैशांची होणार बचत! – छगन भुजबळ

Aprna