HW News Marathi
Covid-19

केरळमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, ६६ टक्के जनता झाली कोरोनाबाधित

तिरुअनंतपुरम | मागील २४ तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल. केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात २२ हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या ५० टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद रोजी सर्व व्यवहार खुले ठेवण्याची परवानगी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून घटलेली कोरोना आकडेवारी पुन्हा उचल खात असून मागील २४ तासांत हे आकडे वाढले आहेत. देशभरातील आकडेवारीत केरळमधील ५० टक्के रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्‍ये दुसरी लाट जाण्याआधीच कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. दुसरी लाटेची आकडेवारी प्रचंड वाढून रुग्णसंख्या अलिकडे कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी येऊन एका विशिष्ट आकड्यांवर येऊन थांबली होती. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दररोजची रुग्णसंख्या ४ लाख रुग्णांवरून २ लाखांवर आली आहे. यासाठी २६ दिवसांचा कालावधी लागला होता. दोन लाखांची रुग्णसंख्या १ लाखावर येण्यासाठी ११ तर १ लाखांवरून ५० हजारांवर यायला २० दिवस लागले. मात्र, मागील ३१ दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची आकडेवारी ३० ते ४० हजारांवर स्थिर आहे.

बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार ८० टक्के कोरोना रुग्ण हे केरळ, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यातील आहेत. केरळमधील ६६ टक्के जनतेला कोरोना संक्रमण झाले आहे. भीतीदायक गोष्ट ही आहे की, ५० टक्के लोकसंख्या केवळ केरळमधील आहे. केरळमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यासाठी कंटेन्मेंट स्ट्रॅटिजीचे उल्लंघन आणि बकरी ईदला दिलेली सवलत या दोन गोष्टी कारणीभूत असल्याचे म्हणणे आहे. मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने केंद्र सरकारने केरळमध्ये पाहणीसाठी पथक पाठविण्याचा निर्णय घेतला. या पथकात ४ सदस्य असतील. कोरोना चाचण्या, उपचार आणि नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत हे पथक पाहणी करेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या महापौर परिचारिकेच्या वेशात कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हजर

News Desk

ज्यांचा पराभव होणार असतो ते आधीच तयारी करतात…! जयंत पाटलांनी डिवचलं

News Desk

जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य – डॉ हर्षवर्धन

News Desk