HW News Marathi
महाराष्ट्र

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा !

धुळे | धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी मतदान झाले. सर्व ठिकाणी आज (ता.६) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.

जिल्हा परिषद सर्कल राजोला येथे कांग्रेसचे अरुण हटवार विजयी तर, अकोट: अकोलखेड सर्कलमध्ये जिल्हा परिषद गणातून शिवसेनेचे जगन निचळ विजयी.अकोला: जिल्हा परिषद कुरणखेड मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे सुशांत बोर्डे विजयी

तेल्हारा: जिल्हा परिषद आडगाव बु. मतदार संघात अपक्ष उमेदवार प्रमोदिनी गोपाल कोल्हे विजयी. बार्शीटाकळी : जि.प.दगडपारवा मतदार संघ राष्ट्रवादीच्या सुमनताई गावंडे विजयी, बाळापूर: जिल्हा परिषद देगाव मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे राम गव्हाणकर विजयी, पातूर जिल्हा परिषद शिर्ला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे सुरेश फाटकर विजयी. खात पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या दुर्गा ठाकरे १३६५ मतांनी विजयी.

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गटातून शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी 2413 मतांनी आघाडीवर. वाशीम – काँग्रेसच्या संजीवनी रणजित राव घुगे जऊळका प स गणातून विजयी, वाशीम – पांगरी नवघरे जि प सर्कलमधून वंचित बहुजन आघाडीच्या लक्ष्मी सुनील लहाने विजयी, मुर्तिजापूर तालूक्यातील जि. प. लाखपूरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे विजयी.वाशीम तालुक्यातील उकळीपेन गटात शिवसेनेचे सुरेश मापारी आघाडीवर, वंचित बहुजन आघाडीचे दत्तराव गोटे पिछाडीवर. पालघर जिल्हा परिषद आणि त्या अर्तंगत येणाऱ्या ७ पंचायत समिती पोट निवडणूकीसाठी ७ तालुक्यातील केंद्रावर एकूण ६९.१५ टक्के मतदान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत झाले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजेंचा दत्तक घेतलेल्या गावात मोठा पराभव

News Desk

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Aprna

मुंबईत २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चे आयोजन; मंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

Aprna