HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरु….

पुणे | सध्या देशात 18 वर्षे तसेच त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आहे. राज्यात तर ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्यात येतेय. तर दुसरीकडे सिरम इन्स्टिट्यूटमार्फत 18 वर्षाखालील मुलांसाठी लस निर्मिती करण्यात आली असून त्याची क्लिनिकल ट्रायल सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील भारती हॉस्पिटलमध्ये 100 मुलांवर ही क्लिनिकल चाचणी केली जाणार आहे. यामध्ये 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस दिली जाईल.

भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही चाचणी करण्यात येणार

देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. तर दुसरीकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी लस निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिरमच्या कोव्हाव्हॅक्स लसीच्या लहान मुलांवरील क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झाली असून भारतात 9 ठिकाणी 1 हजार मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यात तर या चाचणीला सुरुवतादेखील झाली आहे. बुधवारी 9 मुलांना लस देण्यात आलीय.तर दुसरीकडे कोरोनाला थोपवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे एका उपचार पद्धतीच्या चाचणीचे प्रयोग नागपुरातदेखील केले जात आहे. नागपुरात चाचणी करण्यात येत असलेली उपचार पद्धती ही स्प्रेच्या स्वरूपात आहे. या उपचार पद्धतीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल जगातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे.

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर 48 तासांच्या त्याच्या नाकात हा नेझल स्प्रे मारला जातो. दिवसातून सहा वेळा स्प्रेच्या माध्यमातून हे औषध दिले जाते. पाच दिवस ठराविक अंतरावर हा स्प्रे मारायचा आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णावर याची ट्रायल घेण्यात येत आहे.नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधाची तसेच उपचार पद्धतीची याची ट्रायल घेतली जात आहे. विशेष म्हणजे चाचणी पूर्ण झाल्यानंतर या लसीचे परिणाम जर सकारात्मक आले तर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भारती हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ललवाणी यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबईतल्या करी रोड दुर्घटतनेतल्या दोषींवर कारवाई होणार’ – किशोरी पेडणेकर

News Desk

“आपण शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे दिशाभूल करू नये” – अमोल मिटकरी

News Desk

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाना पटोलें सायकलवरून विधानभवनात येणार

News Desk