HW News Marathi
देश / विदेश

विजय माल्या दिवाळखोर घोषित!

लंडन। भारतात बँकेत लोनची अफरातफर करणाऱ्या विजय माल्याला बँक ने दिवाळखोर घोषित केलं आहे. लंडन हायकोर्टाने आज(सोमवार) विजय माल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला आहे. याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कंसोर्टियमने माल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसूलीशी संबंधित खटला देखील जिंकला आहे. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आथा विजय माल्याची संपत्ती जप्त करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. तसचे, विजय माल्याकडून हायकोर्टाच्या आदेशाविरोधात अपील करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचेही समोर आले आहे.

विजय माल्या घोटाळा

देशातून पळून गेलेल्या लिकर व्यावसायिकाने विजमल्याने देशातील १३ बँकांना फसवून ९,४३२ कोटी रुपयांचे नुकसान केले. यात एसबीआयने सर्वाधिक १६०० कोटी कर्ज दिले. त्यापाठोपाठ पीएनबी (८०० कोटी), आयडीबीआय (६५० कोटी) आणि बँक ऑफ बडोदाचा क्रमांक लागतो. मल्ल्या सध्या लंडनमध्ये राहतात आणि सरकार त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करीत आहे. लंडनच्या कोर्टात खटला चालू आहे. याप्रकरणी १० डिसेंबर रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे.

जुलैमध्ये विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बँकांनी त्याचे शेअर विकून ७९२.१२ कोटी रुपये मिळविले होते. स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांकडून डेट रिकव्हरी ट्रिब्युनलने मल्ल्याचे शेअर विकले होते. ईडीने हे शेअर जप्त केले होते. या शेअरमधून आलेला पैसा बँकांचे कर्ज रिकव्हर करण्यासाठी देण्यात आला आहे. ईडीने नुकतीच याची परवानगी डीआरटीला दिली होती.

भारतात केसेस चालू

भारतात मल्ल्या तीन केस लढत आहे. सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याने सेटलमेंट ऑफर दिली आहे. तसेच जजमेंट डेटवर लावण्यात आलेल्या ११.५ टक्के व्याजावर माल्याने आव्हान दिले आहे. तिसरी केस त्याला पळून गेलेला आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याला घोषित केले होते, यावर लढत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सार्वत्रिक लसीकरणावर लक्ष केंद्रित; मनसुख मांडविय यांनी मिशन इंद्रधनुष 4.0 चा केला प्रारंभ

News Desk

शरद पवार सुधारणांच्या बाजूने, राजकारणासाठी काहींचा यूटर्न, मोदींचा थेट पवारांना टोला

News Desk

सैन्यासाठीची मशीन गन खरेदी रद्द

News Desk