HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात काल 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू!

मुंबई। कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.

राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे

राज्यात काल 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 280 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (09), नंदूरबार (6), धुळे (2), जालना (45), परभणी (58), हिंगोली (17), नांदेड (12), अकोला (29), वाशिम (09), बुलढाणा (1), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (4), चंद्रपूर (94), गडचिरोली (19 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात 2,52,309 व्यक्ती होम क्वॉरंटाईन

राज्यात सध्या 36 हजार 675 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,52,309 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 85, 84, 819 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,47, 793 (11.18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या 24 तासात 18,870 रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. काल सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या 20 हजारांच्या आत आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात 18 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 378 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 28 हजार 178 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्या आधी सोमवारी देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली होती तर 179 जणांचा मृत्यू झाला होता.एकट्या केरळमध्ये मंगळवारी 11 हजार 196 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 149 जणांना आपला जीव गमवावा लागला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन, तरुण भारतमधून राऊतांवर टीका

News Desk

नांदेड पोलिसांकडून अट्टल वाहनचोरास अटक, पाच वाहन जप्त

News Desk

Axis बँकेवर ठाकरे सरकारची कृपा, अमृता फडणवीसांवर करत होते टीका

News Desk