HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे- बंगळूर महामार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला

कोल्हापूर | पुणे- बंगळूर महामार्ग अखेर चौथ्या दिवशी म्हणजे आज (२६ जुलै) सकाळी १० वाजता वाहतुकीस खुला झाला आहे. पुणे- बंगळूर महामार्ग खुला झाल्याने अडकून पडलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. महापुराने पुणे बंगळूर महामार्ग व्यापून टाकला होता. शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर काही ठिकाणी सहा फूट तर काही ठिकाणी दहा फुटांवर पाण्याची पातळी होती.

गेल्या शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यानंतर प्रथमतः पुणेकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्याने दुहेरी वाहतूक सुरू केली होती. तर काही कालावधीतच पाण्याची पातळी वाढल्याने सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. गेली चार दिवस या महामार्गावरून वाहतूक बंद होती. आज सकाळी ही वाहतूक सुरु झाली. यामुळे महामार्गावर अडकून पडलेली वाहने मार्गस्थ होत आहेत.

जोरदार पडत असलेल्या पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मध्यरात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.

दरम्यान २२ जुलैला मध्यरात्री कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणारी कार व ट्रक पाण्यातच अडकून पडले. यावेळी रस्ते देखभाल जयहिंद कंपनीसह पोलिस प्रशासनाने मोठ्या शर्यतीच्या प्रयत्नाने कारमधील ५ व ट्रक मधील ३ अशा ८ जणांना सुखरूप बाहेर काढले. असून दोन्ही वाहने पाण्याचा अडकून पडले होते.दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून तहसील प्रशासनाने चिकोडी येथे राखीव असलेल्या एनडीआरएफ तुकडीला पाचारण केले होते. सकाळी दहानंतर प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. दरम्यान सौंदलगा व यमगरणी वेदगंगा नदी पुलावर दोन्ही बाजूला स्थानिक ग्रामपंचायतीच्या तहसील पोलिस तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तळ ठोकून होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. कारभारी काळे यांची नियुक्ती

Aprna

“कोणत्याही ST कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका!” – अनिल परब

News Desk

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढणार !

swarit