HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातल्या पूरस्थितीत, वीज कोसळून १३ जण ठार, बचावकार्यात ५६० जणांची सुटका!

मुंबई। मुंबई, पालघर, कोकण, मराठवाड्यासह संपूर्ण राज्याला अतिमुसळधार पावसाने झोपडून काढले आहे. गेल्या २४ तासांत पालघर, नाशिक, ठाणे आणि मुंबईसह, उपनगरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. यातच मराठवाड्यात अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूर आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५६० हून अधिक नागरिकांना एनडीआरएफच्या टीमने वाचवले आहे. रविवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे आत्तापर्यंत दोनशेहून अधिक जनावरे वाहून गेली आहेत. तर अनेक घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

पुढील २४ तासांत कोकण भागात, मराठवाडा, मुंबई आणि किनारपट्टी भागात ‘अतिवृष्टी’

मुंबईतही मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत कोकण भागात, मराठवाडा, मुंबई आणि किनारपट्टी भागात ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाने प्रचंड नुकसान केला आहे. तर औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हैदोस घातला आहे.

विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मांजरा धरणाच्या लगतच्या भागात मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडले. यामुळे बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.

नदीकाठच्या गावांमध्ये पूर आलाय

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले की, या आठ जिल्ह्यांच्या १८० मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाणी काढण्यासाठी अनेक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, ज्यामुळे बीड आणि लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावांमध्ये पूर आलाय. आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या ४८ तासांमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये १० लोकांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये तीन, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी दोन आणि जालना, नांदेड आणि लातूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्याचे नऊच दिवस असतात, अजित पवारांचा टोला

News Desk

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उर्वरित कामही वेळेत आणि दर्जेदार व्हावे!– सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

Aprna

HW Exclusive: राजसाहेबांनी सांगितलं तर भाजपसोबत जाणार…

swarit