HW News Marathi
महाराष्ट्र

गुलाब चक्रीवादळाचे ठाण्यात आगमन!

ठाणे | राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नुकसान झालं होतं. या नुकसानातून नागरिक सावरत असताना अजून एक संकट पुढे येत आहे. गुलाब वादळ ठाण्यात येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि महानगरपालिका देखील सज्ज आहे. 1 ऑक्टोबर पर्यंत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत कोकण किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सदर कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.तसेच सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

आपत्कालीन नंबर जाहीर

ठाणे महानगरपालिकेने आपत्कालीन क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांना काही त्रास झाल्यास व मदत हवी असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन पालिकेने लोकांसाठी केलं आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – 1800 222 108 व हेल्पलाईन – 022 25371010 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

अकोला आणि नांदेडमध्येही मुसळधार

अकोला जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून याठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर नांदेड जिल्ह्यातही साधारण अशीच परिस्थिती आहे. रात्रीपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून नांदेड शहर जलमय झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.

जळगावात दोघांचा वीज कोसळून मृत्यू

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाच वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे मुरखीबाई वागणे 24 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर विटनेर येथे अचानक घरावर वीज पडल्याने सोनाली बारेला या मुलीचा मुत्यृ झाला आहे. याशिवाय, रावेर तालुक्यात वीज पडल्याने तीन लहान मुले भाजल्याची घटना घडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

News Desk

रश्मी ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून जमीन खरेदी केली, त्याची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी

News Desk

नांदेडमध्ये वीज पडून शेतकरी जखमी, एक म्हैस व गायीचे वासरु ठार

News Desk