HW News Marathi
देश / विदेश

ममता बॅनर्जींनी तालिबानशी केली भाजपची तुलना; म्हणाल्या…

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली असून केंद्रातील भाजप सरकारची तुलना थेट तालिबान राजवटीशी केली आहे. त्याचबरोबर एकटी तृणमूल काँग्रेसचं भाजपचा मात द्यायला पुरेशी आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. ममला कोलकाता येथे बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, तुमच्यामध्ये मला थांबवण्याची क्षमता नाही. मी काही परदेशातील देशांना भेटी देण्यासाठी उतावीळ झालेले नाही. पण मला जर संबंधित देशांमधून बोलावणं आलं असेल तर ही अभिमानाची बाब आहे.

मी देखील एक हिंदू महिला आहे. मग तुम्ही मला परवानगी का देऊ शकत नाही?

तुम्ही केवळ हिंदूंबद्दल बोलत राहा, मी देखील एक हिंदू महिला आहे. मग तुम्ही मला परवानगी का देऊ शकत नाही? कारण तुमच्यामध्ये ईर्षेची भावना आहे, अशा शब्दांतही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.”रोममध्ये जागतीक शांततेबाबत बैठक पार पडली, जिथे मला निमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत जर्मन चान्सलर पोप हे देखील हजेरी लावणार होते. इटलीनं मला या बैठकीसाठी विशेष परवानगी दिली होती. पण मला केंद्र सरकारनं मला विमान प्रवासासाठी क्लिअरन्स दिला नाही. हे एखाद्या मुख्यमंत्र्यांसाठी योग्य नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर हल्लाबोल केला.ममता म्हणाल्या, “आपल्यालाच आपलं स्वातंत्र्य टिकवावं लागेल. तालिबानी भाजप देश चालवू शकत नाही. एकटी तृणमूल काँग्रेसच भाजपला हारवू शकते. भवानीपूर येथून खेला होबे ला सुरुवात झाली होती ती आता संपूर्ण देश जिंकल्यानंतर संपेल”

त्या पुढे म्हणाल्या, तुमच्यामध्ये मला थांबवण्याची क्षमता नाही. मी काही परदेशातील देशांना भेटी देण्यासाठी उतावीळ झालेले नाही. पण मला जर संबंधित देशांमधून बोलावणं आलं असेल तर ही अभिमानाची बाब आहे. तुम्ही केवळ हिंदूंबद्दल बोलत राहा, मी देखील एक हिंदू महिला आहे. मग तुम्ही मला परवानगी का देऊ शकत नाही? कारण तुमच्यामध्ये ईर्षेची भावना आहे, अशा शब्दांतही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली ! शरद पवारांच्या ‘त्या’ भर पावसातील सभेची वर्षपूर्ती

News Desk

अभिमानास्पद ! विदर्भाचा माणुस थेट स्कॅाटिश संसदेत झाला खासदार

News Desk

२९ वस्तूवरील जीएसटी हटवली

swarit