HW News Marathi
Covid-19

शाळा, मंदिरं, थिएटर उघडले; आता नंबर मुंबई लोकल ट्रेनचा ?

मुंबई | करोनाची लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारनं टप्प्याटप्प्यानं एकेक क्षेत्र खुले केले. शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सिनेमा व नाट्यगृहे आणि लोकल ट्रेन याबाबत निर्णय प्रलंबित होता. त्यातील पहिल्या तीन गोष्टी खुल्या करण्याचा निर्णय अखेर सरकारनं घेतला आहे. आता मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेनं सुरू न झाल्यामुळं अजूनही अनेक कार्यालयं व आस्थापना बंद

सध्या कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, लोकल ट्रेनवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांपैकी फारच कमी लोकांनी दोन डोस घेतले आहेत. त्यामुळं अजूनही अनेकांना लोकल प्रवास करता येत नाही. परिणामी कामाची ठिकाणं गाठताना त्यांची फरपट होत आहे. लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेनं सुरू न झाल्यामुळं अजूनही अनेक कार्यालयं व आस्थापना बंद आहेत. त्याचा फटका चतुर्थ श्रेणी कामगारांना बसला आहे. त्यांचा रोजगारच हिरावला गेला आहे. लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरणाचा वेग मंद आहे, त्यामुळं ती अट पूर्ण करून लोकल प्रवास करण्यासाठी अनेकांना बरीच वाट पाहावी लागणार आहे. सरकारनं आता आणखी अंत पाहू नये, असं हातावर पोट असलेल्या लोकांचं म्हणणं आहे.

करोनाची तिसरी लाट ओसरली आहे. अपवाद वगळता करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईतही हा करोना संसर्गाचा दर आटोक्यात आहे. त्यामुळं राज्य सरकारनं ४ ऑक्टोबरपासून शाळा, ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळं आणि २२ ऑक्टोबरपासून थिएटर्स खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं मुंबईकरांकडून आता लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! केरळमध्ये आज एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही

News Desk

ग्रीन-ऑरेंज झोन जिल्ह्यात बाहेरून नागरिकांना पाठवू नये, कोरोनाची लोकांच्या मनात भीती !

News Desk

शरद पवारांनी घेतला सातारा, कोल्हापूरमधील कोरोनास्थितीचा आढावा

News Desk