HW News Marathi
महाराष्ट्र

पवार परिवाराशी संबंधित पारनेर कारखाना घोटाळाप्रकरणी लवकरच कारवाई सुरू होणार – सोमय्या

मुंबई। मी पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या सोबत पारनेर साखर कारखान्यास भेट देणार आहे. ३२ कोटी रुपयांमध्ये कशा पद्धतीने कारखाना पवार परिवाराच्या प्रभावाखाली दिला गेला. पवार परिवाराचे घनिष्ठ उद्योगपती मित्र यांनी त्यामध्ये २३ कोटी रुपये कसे टाकले? या सगळ्यांचे पुरावे माझ्या हातात आलेले आहेत. ईडीसोबत माझी चर्चा सुरू आहे. परवा मी पारनेर साखर कारखान्याची पाहणी केल्यानंतर ईडी सोबत चर्चा करणार आहे. पारनेर साखर कारखान्याची आयकर विभाग, सहकार मंत्रालय आणि ईडी कडून चौकशी सुरू आहे. जरंडेश्वर नंतर पवार परिवाराशी संबंधित पारनेर साखर कारखान्याचा घोटाळ्याबाबत येत्या काही आठवड्यात कारवाई सुरू होणार.” अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.

कागदपत्र जनतेसमोर मांडणार

यावेळी सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांच्या संबंधात मी एवढच सांगणार, की ठाकरे सकारच्या राज्यात मंत्री झाल्यानंतर त्यांनी कशापद्धतीने गडहिंग्लज साखर कारखाना काबीज केला. कोणत्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया नाही. थेट मंत्रालयातून हसन मुश्रिफांच्या बेनामी कंपनीला कारखाना दिला गेला आणि त्यात पैशांची हेराफेरी हे उद्धव ठाकरेंच्या राज्यात झालेलं आहे. मी पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या मंत्रालयाचं कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या बेनामी कंपनीला कशा पद्धतीने दिलं, याचे देखील कागदपत्र जनतेसमोर मांडणार आहे.”

अतुल चोरडियांनी हे पैसे दिले

याचबरोबर, “पवार परिवाराचे घनिष्ठ मित्र, उद्योजक त्यांनी यामध्ये २३ कोटी रुपये हा साखर कारखाना घेण्यासाठी दिले होते. ३२ कोटीत लिलाव झाला. अतुल चोरडियांनी हे पैसे दिले. यात कोणकोण आहेत? कारण, जरंडेश्वरमध्ये असंच झालं. ६५ कोटीत कारखाना दिला गेला आणि ते ६५ कोटी कोणी भरले?, ओंकार बिल्डर्स. त्या बिल्डर्सचा आणि साखर कारखान्याचा संबंध काय? पवार परिवार काय म्हणतं आमच्याशी संबंध म्हणजे जगाशी संबंध. तर ओंकार बिल्डर आज सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्याच्याकडून अजित पवारांच्या पत्नीच्या नावाने लोन लिस्ट देण्यात आलं. अशाच प्रकारचं कटकारस्थान पारनेर कारखान्यात दिसत आहे.” असं किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवलं.

उच्च न्यायालयात जायचं आहे

तसेच, “मी उद्या ईडी केड गडहिंग्लज साखर कारखान्याचे सगळे कागद आणि माझी तक्रार सुपूर्द करणार. उद्या माझ्या वकिलातर्फे पुन्हा एकदा कोल्हापूर पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली जाणार. कारण, हसन मुश्रीफच्या विरोधात ठाकरे सरकारने, ईओडब्ल्यूने आतापर्यंत काहीही करावाई केलेली नाही. एवढी कागदपत्रे दिल्यानंतरही, तर आता मला खासगी तक्रार करावी लागणार आहे. खासगी तक्रारीसाठी मला कागल येथे पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणार.आता वकील नोटीस देणार की आम्हाला उच्च न्यायालयात जायचं आहे, उच्च न्यायालयात जाण्या अगोदर पोलीस तक्रार करावी लागते की आपण सहकार्य करा.” अशी माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा” – चंद्रकांत पाटील

News Desk

‘राज्यपाल महाराष्ट्राची मोठी समस्या’; शिवसेनेची टीका

News Desk

गोदावरीला पूर, जायकवाडीचा साठा 30 टक्क्यांवर

News Desk