HW News Marathi
Covid-19

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांविरुद्ध हक्कभंग, काँग्रेस मांडणार प्रस्ताव

नवी दिल्ली | देशात कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असं अजब उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आरोग्य विभाला या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना देशातल्या राज्य सरकारांनी केंद्राला पाठवलेल्या रेकॉर्डमध्ये ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला आहे अशी नोंद केलेली नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पॅगसेस प्रकरणावरुन सरकारची कोंडी झाली असताना आता या मुद्द्यावरुनही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला झाला नाही अशी माहिती देणाऱ्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध काँग्रेसने हक्कभंग आणण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्रदेशाने ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली नाही, असे उत्तर पवार यांनी दिले होते. केंद्र सरकारच्या या उत्तराने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी देखील सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन, “सिर्फ़ ऑक्सीजन की ही कमी नहीं थी। संवेदनशीलता व सत्य की भारी कमी- तब भी थी, आज भी है।” असा टोला लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटांवर धैर्याने मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे !

News Desk

कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करा-अजित पवार

News Desk

आता तरी जागे व्हा ! फडणवीसांचा आघाडी सरकारला सल्ला 

News Desk