HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गालबोट,बॅनरवर फोटो नसल्याच्या नाराजीतुन तालुकाप्रमुखाला गंभीर मारहाण

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेना व युवा सेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे याच अभियानातुन परंडा तालुक्यातील शिवसेनेतील शिवसैनीकांत राडा झाला आहे. तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत

शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर लावला नसल्याने,परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे समर्थक नाराज असल्याचे बोलले जात होते तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना डावलले जात असल्याची नाराजी त्यांच्या समर्थकांमध्ये होती त्यातूनच हा राडा झाला असल्याचे बोलले जातेय

परंडा तालुक्यात पूर्वी भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे वर्चस्व होते.या तालुक्यात आमदार तानाजी सावंत यांचा शिरकाव झाल्यापासून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना शिवसेनेच्या कार्यक्रमात बॅनरवर डावलले जात असल्याची चर्चा पाटील समर्थक करताना दिसत होते. परंतु पाटील यांनी गतवेळी झालेल्या विधानसभेत आमदार तानाजी सावंत यांच्या बाजुने मदत केल्याचे ही दिसून आले होते, परंतु सद्यस्थितीत परंडा तालुक्यात सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर लावला नसल्याच्या नाराजीतुन तालुका प्रमुखाला मारहाण झाल्याचे बोलले जात आहेशिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असल्याचे बोलले जात आहे तर दोन्ही आजी माजी आमदारांनी यावर मात्र अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही

सदरील घटना २० जुलै रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान परंडा शहरात घडली तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव हे कामानिमित्त करमाळा रोडवर एका हॉटेल मध्ये बसले असता या वेळी जाधव यांना पाटील समर्थकांच्या गटाने तुंबळ मारहाण केल्याची घटना घडली

तरआतापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत नाही तर या प्रकरणाला पुढे जाऊन कोणते वळण लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेतर आगामी जिल्हा परिषदा पंचायत समित्या व पुढील निवडणुकांवर या प्रकाराचा काय परिणाम होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशवंतराव  चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपयांची मदत

News Desk

धारावीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला लागण

News Desk

“संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा,या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही” – शरद पवार

News Desk