मुंबई। राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड, उत्तर-पश्चिम मध्यप्रदेश, पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण होतंय. स्मॉल ऑरेंज डायमंड बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात पश्चिम- उत्तर पश्मिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिलीय.
कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
19 सप्टेंबर- राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला 19 सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)
21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)
राज्यात पुढचे 4,5 दिवस पावसाची शक्यता आज IMD ने वर्तवली:
🔸उत्तर-पश्र्चिम मध्यप्रदेश,पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण
🔸बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरीसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात
पश्र्चिम-उत्तर:पश्र्चिम दिशेने सरकण्याची शक्यता. https://t.co/QwGhRHaIDp— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 18, 2021
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवड्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. आता पुन्हा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.